शिवशंभू जिजाऊ सेना संघटनेच्या पदाधिकारी निवडी जाहीर..

दिनांक २५ मे २०२१ रोजी शिरुर येथे शिवशंभू जिजाऊ सेना पदाधिकारी बैठक पार पडली. त्यावेळी सध्याचा कमी झालेला दूधाचा दर, त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा आर्थिक तोटा व शेतकऱ्यांसंदर्भातील पिकविमा याबाबत विशेष चर्चा करण्यात आली.

तसेच संघटनात्मक कार्याबद्दलही चर्चा करण्यात आली. यावेळी नविन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष योगेश ओव्हाळपाटील, तालुकाध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे, महिला तालुकाध्यक्षा सौ सोनाली घावटे, उपाध्यक्ष शैलेंद्र शेळके, विजूभाऊ घावटे यांच्या उपस्थितीत गजानन (तात्या) मगर यांची शिवशंभू जिजाऊ सेना सल्लागार पदी निवड करण्यात आली. तर, रामकृष्ण गायकवाड यांची सरचिटणीस पदी व कु. स्मिता इसवे यांची शिरुर तालुका युवती प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष योगेश ओव्हाळ पाटील व तालुकाध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला दिलेल्या माहितीत सांगितले.