पिंपळे सौदागर येतील प्रशासकीय दवाखाण्याचा लवकरात लवकर विस्तार करावा,सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांची मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०१ ऑक्टोबर २०२२

पिंपळे सौदागर


पिंपळे सौदागर म्हणजे आयटीयन लोकाची लोक वस्ती म्हणून ओळखले जाणारे, झपाट्याने वाढणारा परिसर, कष्टकरी, होतकरू,गरजु लोकवस्ती चार परीसर असल्याने त्याठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्या भागातील जनसामान्यांच्या गरजा भागविण्यासाठी गेले कित्येक वर्षे प्रशासनाला जागे करण्याचे काम सातत्याने सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांचा हट्टाहास नेहमी असतो. पिंपळे सौदागर येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना १९८६ ला स्थापना झाला. तेव्हा पासुन आज पर्यंत सुव्यवस्थित सुरु आहे. दवाखाण्यातील स्टाफ व सेवक वर्ग अतिशय नम्रपणे काम करत असल्याने पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ १ ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक म्हणजे रूग्ण सेवा घेतात.

दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडी ची सेवा घेतात.संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.तसेच बालक लसीकरण मोहीम ही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी,निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जाते परीणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते.सर्व रुग्णांची आवश्यकते नुसार रक्त तपासणी ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे.गरोदर माता तपासणी व प्रसृती नंतर आरोग्य सेवेचे ही काम ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे.अश्या अनेक सोईसुविधा युक्त दवाखाना असल्या कारणाने सहाजिकच अतिभार व गैरसोईनचा सामना रुग्णा बरोबर कर्मचारी वर्गासही भोगावा लागत आहे.

 

सध्या हा दवाखाना साधारणपणे ५०० स्क्वेअर फूट मध्ये सुरु आहे. दवाखाण्याची इमारत बहुमजली असुन सुद्धा त्याचा फायदा रूग्णांसाठी होत नाही ही बाब आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी निवेदनाद्वारे केले आहे. तश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *