पडेल ती किंमत देऊन भाजपनं शिवसेना फोडली – जयंत पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


सत्तेविना भाजप राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी चांगली साथ दिली. शरद पवारांनी पुढाकार घेऊन या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यामुळं या विरोधी काही करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचं नावं घेतलं जातं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल असा टोला देखील पाटील यांनी भाजपला लगावला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *