भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या वनडे सामन्यात 7 विकेटने पराभव

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


भारताने दक्षिण आफ्रिकेचे 100 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 व्या षटकात पार करत मालिका 2 – 1 अशी खिशात टाकली. भारताकडून शुभमन गिलने 49 तर श्रेयस अय्यरने नाबाद 28 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने भेदक मारा करत 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या. त्याला मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून क्लासेनने सर्वाधिक 34 धावा केल्या.

टीम इंडियाने 2-1 ने जिंकली मालिका

दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिलने चांगली सुरूवात केली. मात्र शिखर धवन 14 चेंडूत 8 धावा करून धावबाद झाला. शिखर धवन बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत संघाला 10 व्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली.दरम्यान, शिखर धवन बाद झाल्यानंतर आलेल्या इशान किशनने 18 चेंडूत 10 धावा करून गिलची साथ सोडली. किशन बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवली. दरम्यान, शुभमन गिल देखील अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र अर्धशतकाला फक्त 1 धाव गरजेची असताना एन्गिडीने त्याला पायचीत बाद केले. अखेर श्रेयस अय्यरने षटकार मारत सामना संपवला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *