पावसाळ्याच्या तोंडावर खुल्या मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर पेक्षा महपालिकेच्या हॉस्पिटल व इमारतींचा वापर करावा.- विठ्ठल उर्फ नाना काटे माजी विरोधी पक्षनेते…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि ४ मे २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरात खुल्या मैदानात दोन जम्बो कोविड केअर सेंटर उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नव्याने जम्बो सेंटर उभारणी करण्यापेक्षा महापालिकेने बनवलेले नवीन हॉस्पिटल व तयार इमारती वापरून कमीत कमी रकमेत रुग्णांसाठी सोय करावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. यामुळे पालकमंत्री यांच्या आदेशाचे पालन करा, गावजत्रा मैदान आणि सांगवी येथील पी डब्ल्यू डी मैदान येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभे करण्याची तयारी पावसाळ्याच्या तोंडावर करू नये.


मोकळ्या मैदानांवर मोठा खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभे करण्यापेक्षा महापालिकेच्या मोकळ्या इमारती वापराव्यात. आकुर्डी व थेरगाव येथे महापालिकेचे नव्याने उभारलेले हॉस्पिटल तातडीने सुरू करावीत. तसेच चिंचवड येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये सर्व यंत्रणा असताना यावर्षी त्याचा उपयोग करून घेतला नाही. तसेच बालेवाडी, घरकुल वसाहत येथे काही इमारती कोविड सेंटरसाठी घ्याव्यात. काही लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर मोकळ्या मैदानावर तेही पावसाळ्याच्या तोंडावर मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून काही कोटी रुपये गुंतविण्यापेक्षा महापालिकेच्या वरील इमारतीचा वापर करून बचत करावी.

गतवर्षी मगर स्टेडियम वरील जम्बो कोविड केअर सेंटर पावसाळ्यात दोन महिने बंद ठेवावे लागले होते. पावसाचे पाणी साठल्यामुळे तेथे रुग्ण ठेवणे धोकादायक झाले होते. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे महापालिकेचा कर संकलन कमी झाले आहे. एकीकडे आर्थिक संकट असताना सद्य परिस्थितीत अशी व्यवस्था उभारण्यासाठी कोट्यावधी खर्च करून ती बंद ठेवणे पालिकेला परवडणारे नाही. महापालिका प्रशासनाने सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला बळी न पडता सामान्य पिंपरी-चिंचवडकरांचा पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *