आधार कार्डला दहा वर्षे झाली असतील तर अद्ययावत करावे लागणार आहे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२

पिंपरी


आधार कार्डला दहा वर्षे झाली असतील तर आधार केंद्रात जाऊन ते अद्ययावत करावे लागणार आहे . पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल . तसेच , त्यात बदल झाला नसला तरी पडताळणीसाठी सध्याचा पत्ता आधार केंद्रात द्यावा लागणार आहे . ही बाब ऐच्छिक आहे. परंतु आधारकार्ड अद्ययावत झाल्यास संबंधित व्यक्ती त्याच पत्त्यावर राहत असल्याचे स्पष्ट होणार आहे . शिवाय बँक खात्यासह आणि सरकारी अनुदान योजनांसाठी इ – केवायसी करणे सोपे जाणार आहे.

देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधारकार्ड हा विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा समजला जातो. आधार केंद्रांवर नवीन आधार काढण्यासह कार्डावरीलछायाचित्र , पत्ता , नावातील बदल करण्याचे काम केले जाते. मोबाईल क्रमांक आधारकार्डला लिंक करणे , तर , आधारकार्ड हे पॅन कार्ड आणि बँक खात्याशीही लिंक करणेआवश्यक आहे . यासोबतच आता आधारकार्डला दहा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना ते अद्ययावत करून घेण्याबाबत मोहीम सुरू करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *