लाच मागितल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत विभागाने घेतले ताब्यात…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिक्रापूर : दि. 11/06/2021

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करून घेण्यासाठी, 25 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, शिक्रापुरच्या तलाठ्यासह एका खाजगी व्यक्तीवर, पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने, शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, 1) अविनाश केवलसिंग जाधव, तलाठी, शिक्रापूर, (वय 32 वर्षे, रा. शिरूर) व

2) पंडित उमाजी जाधव (वय 32 वर्षे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यातील आरोपी क्रमांक 2 याचेकडे लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. त्यास आरोपी क्रमांक 1 यानी सहाय्य करून, तक्रारदार याचेकडे लाच रक्कम मागीतली, म्हणून याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertise

यातील तक्रारदार यांनी पत्नीच्या नावावर शिक्रापूर येथे एक गुंठा जागा घेतली होती. या जागेची नोंद करण्यासाठी, त्यांनी अर्ज केलेला होता. त्यावेळी लोकसेवक अविनाश यांनी सातबारा उताऱ्यावर याची नोंद घेण्यासाठी, 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांनी याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित विभागाने याची पडताळणी केली असता, त्यात तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच खासगी व्यक्ती पंडित यांच्या सांगण्यावरून मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गुन्हयाचे तपासकामी मा. न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे .
सदर तपास हा लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या करत आहेत .
सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र)
अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (ला.प्र.वि. पुणे),
सुहास नाडगौडा (अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे) यांचे मार्गदर्शनाखाली,
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
तसेच, शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास, त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केलेले आहे.
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , २६१३२८०२ , २६०५०४२३ ३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३ ४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *