विरोधकांचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत – किशोरी पेडणेकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू असताना किशोरी पेडणेकर यांनी आज शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यानी प्रतिक्रिया दिली आहे.

मशाल निशाणी ही १९८५ ला शिवसेनेला मिळाली होती. त्यावेळी छगन भुजबळ त्यावर निवडणूक लढले होते. आज २०१२ ला बाळासाहेब गेल्यानंतर जी मशाल स्मृतीस्थळावर लावण्यात आली होती. ती कायम धगधगते आहे. ते चिन्ह आम्हाला मिळाले आहे. आज वाईट पद्धतीने बाळासाहेबांच्या पक्षाला बुडवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, जेव्हा नियतीचे उत्तर देते, तेव्हा सर्वच शांत होतात. आज निशाणी जी मिळाली आहे. हा नियतीचाच प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन नावे आणि चिन्हे दिली होती. त्यापैकी मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे. हे नाव आणि चिन्ह तात्पुरते असली, तरी शिवसैनिकांच्या मनाला उभारी देण्याचे काम करणार आहेत. शिवसैनिक निखारा आहे, तो कधीही पेटला असता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाने ते होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधकांचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत,असेही त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *