ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह

पिंपरी-चिंचवड 

अतुल परदेशी 

मुख्य संपादक 

दि.10/10/2022


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले असून ठाकरे आणि शिंदे गटामुळे शिवसेना पक्षात उभी फुट पडली आहे.या निर्माण झालेल्या राजकिय परिस्थीती नुसार निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले असून फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरा येणार नाही असे आदेश देण्यात आले होते.

ठाकरे गटाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

चिन्ह आणि नाव याची आज सुनावणी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. त्रिशूल आणि उगवता सूर्य हे दोन्ही गटाने मागणी करण्यात आली असल्याने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे.

शिंदे गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना

शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे असेन शिंदे गटाकडून गदा,त्रिशूल, उगवता सूर्य हे चिन्ह निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती यापैकी उगवता सूर्य आणि त्रिशूल हे दोन्ही गटाकडून सारखीच मागणी करण्यात आली असल्याने शिंदे गटाला पुन्हा मंगळवार दि.11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *