आळेफाटा (बातमी- विभागीय संपादक रामदास सांगळे)
आळेफाटा (ता.जुन्नर) येथील श्री हॉस्पिटल तसेच ओम चैतन्य हॉस्पिटल मध्ये २५० रुपये मध्ये कोरोना लस मिळणार आहे. अशी माहिती डॉ. सचिन शिंदे व डॉ. प्रदीप गुंजाळ यांनी दिली.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच लसीकरण केंद्र आळेफाटा येथे या दोन ठिकाणी सुरू केले आहे.लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरिक तसेच वय ४५ च्या वरील डायबिटीस, हायपर टेन्शन किंवा इतर आजार असणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे येथे जेष्ठानी संपर्क करावा असे आवाहन श्री हॉस्पिटलचे संचालक डॉ.सचिन शिंदे व ओम चैतन्य हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रदीप कणसे यांनी केले आहे.