सुषमा अंधारे यांची शिंदे गटासह भाजपवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० ऑक्टोबर २०२२


निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. दम्यान, यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपावरही टीका केली आहे.

जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या लांब पडायला लागतात, तेव्हा समजून घ्याव की अंधार जास्त पडतो आहे. हे सर्व भाजपाचे कारस्थान आहे. हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि जिंकू, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *