भारत कृषी सेवेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

रामदास सांगळे
विभागीय संपादक, जुन्नर
२६ जुलै २०२२

आळेफाटा


भारत कृषी सेवा या कंपनीचा प्रथम वर्धापनदिन सोहळा लोणावळा येथे कंपनी चे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या ओळखत, अनेक नवनवीन योजना सुरू केल्या होत्या.शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणे हा महाराजांचा हेतू होता. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला सुद्धा महत्त्व दिले पाहिजे ही भूमिका महाराजांची नेहमीच राहिली. ह्याच संकल्पनेतुन हाच वारसा पुढे चालवत भारत कृषी सेवा कंपनीच्या सीईओ शरयू लांडे आणि हेमंत ढोले पाटील यांनी भारत कृषी सेवा या कंपनीची स्थापना 20 जुलै 2021 या रोजी केली. कोरोना काळात लोक बेरोजगार होत असताना सर्व शेतकरी हवालदिल झालेला असताना भारत कृषी सेवा कंपनी ने मात्र याच काळात लोकांना रोजगार दिला व शेतकऱ्यांना सेवा देण्यास सुरुवात केली. भारत कृषी सेवेने शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सेवा देऊन शेतकऱ्यांना हायटेक करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.शेती उत्पादन व व्यवस्थापन यामध्ये भारताला इस्रायल पेक्षाही पुढे नेण्याचा संकल्प या दिवशी ठेवलेला आहे.

भारत कृषी सेवेचा प्रत्येक कर्मचारी हा शेती क्षेत्रामध्ये तज्ञ आहे.या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचे सल्ले तर दिले जातातच शिवाय शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची पोहोच पावती म्हणून त्यांना सन्मानित देखील केले जाते. शेतकऱ्यांच्या पाठीवर मायेची शाल टाकली जाते.कोणत्याही वातावरणात भारत कृषी सेवेचा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व निविष्ठा पोहोच करण्याचं काम अगदी प्रभावीपणे करत आहे. आज फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शेतकरी भारत कृषी सेवेकडे एक परीस म्हणून पहात आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने सोनं होणार आहे.

भारत कृषी सेवा हे अँड्रॉइड मोबाईल वरील एक अप्लिकेशन असून त्यामार्फत शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन सॅटेलाईट शेती पाहणी आणि त्याचे पीक मार्गदर्शन, हवामान बदलाची दैनंदिन माहिती,पीक लागवड, शेतीमालाला उपलब्ध बाजारपेठ त्यांचे बाजारभाव, तसेच पिकांवर फवारणी करण्यासाठी विविध कीटकनाशके, पेस्टी साईड्स,फर्टिलायझर याची सर्वसमावेशक माहिती तसेच ऑनलाईन द्वारे त्याची घरपोच डिलिव्हरी याची विशेष सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.प्रत्येक शेतकऱ्यांने निश्चित आपल्या मोबाईल मध्ये भारत कृषी सेवा हे मोबाईल अँप्स डाऊनलोड करून सर्व कृषी सेवेचा लाभ घ्यावा. या कंपनीला एक वर्ष पूर्ण झाले. त्याचे औचित्य साधून लोणावळा येथे भारत कृषी सेवेचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कंपनीतर्फे विविध कर्मचाऱ्यांनी आपली कला देखील दाखवली. सर्वांनी मनोगत व्यक्त करताना कंपनीबद्दल खूपच आस्था व प्रेम दाखवले. कंपनीच्या एक वर्षांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत अनेक कर्मचाऱ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राजकुमार गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कंपनीचे मॅनेजर म्हणून वीरभद्र गोगे यांनी देखील कंपनीचा विस्तार सांगितला. कंपनीचे हेमंत ढोले पाटील यांनी कंपनी नेहमीच शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील असा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीच्या सीईओ शरयू मॅडम या होत्या.शरयू मॅडम यांनी आपले भावनिक मनोगत या वेळी व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *