पुणे महापालिका – काम एका विभागात आणि पगार मात्र दुसऱ्या विभागात

१४ डिसेंबर २०२२

पुणे


पुणे महापालिकेत ठरावीक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. कर्मचारी बदली झाली तरी जुन्याच विभागात काम करत आहेत आणि पगार मात्र बदली झालेल्या ठिकाणावरून काढत आहेत. असे पहिल्या यादीत १४५ जण आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधित खातेप्रमुखांवर कारवाई करा, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

महापालिकेतील सेवकांच्या बदल्यांविषयक २००४ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी धोरण तयार केले. कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्यांना लगेचच संबंधित विभागात रुजू होणे आवश्‍यक आहे. जर खातेप्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास खातेप्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे या धोरणामध्ये नमूद केलेले आहे.

परंतु, प्रशासनाने या धोरणाला हरताळ फासला आहे. महापालिकेतील वरिष्ठ लिपिक ते अधीक्षक पदावरील १५३ सेवक बदली होऊन देखील जुन्या विभागात काम करत आहेत व पगार नव्या विभागातून काढत आहेत. माहिती अधिकार कायद्यातून ही माहिती समोर आली आहे, त्यामुळे संबंधित खातेप्रमुखांवर कारवाई करा, अशी मागणी अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *