बी. डी. काळे महाविद्यालयात ओपन जिमची उभारणी…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव –  येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी. काळे महाविद्यालयासाठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजने अंतर्गत ओपन जिम उभारण्यात आली आहे.

याचे उदघाट्न घोडेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षकश्री. लहू थाटे साहेब यांच्या शुभहस्ते  झाले. या प्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष सुरेशशेठ काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अडव्होकेट संजय आर्वीकर, स्कुल कमिटीचे चेअरमन शिवदास काळे, प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव उप प्राचार्य भागवत पवार तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग व विद्यार्थी हजर होते.

यात विविध व्यायाम प्रकारच्या एकूण सात व्यायाम साहित्याचा समावेश आहे .प्रत्येक व्यायाम साहित्यावर कशा प्रकारे व्यायाम करायचा याचे प्रात्यक्षिकही शारीरिक शिक्षण संचालक प्रा. भाऊसाहेब थोरात यांनी या वेळी करून दाखविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वल्लभ करंदीकर याने केले.

Advertise