मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आमदार महेश लांडगे कुटुंबायांचे सांत्वन 

पिंपरी-चिंचवड 

दि.09/10/2022


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रविवार दि.9 ऑक्टोबर रोजी भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी चे आमदार  महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भेट देत लांडगे कुटुंबायांचे सांत्वन केले.

आमदार लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांचे नुकतेच निधन झाले. त्याबाबत लांडगे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी येथील निवासस्थानी आले होते.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *