बेल्हे दि.२३ (विभागीय संपादक रामदास सांगळे):-
पुणे ग्रामिणच्या गुन्हे शाखेने राजुरी (ता.जुन्नर) परिसरात वेश्या व्यवसाय करताना धाड टाकून तीन पिडीत मुलींची सुटका करुन वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार (दि.२२) रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास राजुरी गावचे हद्दीत आळेफाटा ते नगर रोडच्या कडेला सह्याद्री कॉलेज समोर मोकळे रस्त्याचे कडेला कार (नंबर एम एच 14 EY 1652) मध्ये आरोपी मीना विजय गायकवाड (वय ४२ वर्षे राहणार केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर) कल्पना बाबू जाधव ( वय ४१ राहणार केडगाव तालुका जिल्हा अहमदनगर ), श्रीराम दशरथ कचरे (वय ४० राहणार गांधीनगर भोलेगाव तालुका जिल्हा नगर ) आणि प्रवीण पंढरीनाथ सदाफुले (वय २९ राहणार आळे स्टॅन्ड तालुका जुन्नर जिल्हा पुणे) हे चौघे तिन पीडित मुलींना वेश्या व्यवसायाकरिता प्रोत्साहित करून त्यांच्याकडून अनैतिक शारीरिक व्यापार करून पैसे मिळवत असताना मिळून आले.या वेळी २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम आढळून आली आहे. या प्रकरणी मीना विजय गायकवाड राहणार केडगाव जी नगर, कल्पना बाबू जाधव (वय ४१ राहणार केडगाव जी नगर), श्री राम दशरथ कचरे वय ४० राहणार गांधीनगर भोलेगाव), प्रवीण पंढरीनाथ सदाफुले (वय २९ राहणार आळे स्टँड तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यांचे विरुद्ध स्त्री या व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद पूनम कांबळे या महिला हवालदाराने दिली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामिणच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवत याचे आदेशानुसार पोलिस उप निरीक्षक अमोल गोरे तसेच सहा पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय जगताप,पोलिस नाईक दीपक साबळे, पोलिस अमलदार संदीप वारे, पोलिस नाईक अक्षय नवले, पोलिस हवालदार पूनम कांबळे,महिला पोलिस नाईक सुनीता मोरे, यांनी सदरची कारवाई केलेली आहे.