राज्य मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन पिंपरी चिंचवड मध्ये होणे हा शहरासाठी गौरव ; सर्वोतोपरी मदत करणार- अजित पवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० ऑक्टोबर २०२२

पिंपरी


राज्य मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबर रोजी पिंपरी चिंचवड येथे होत आहे या अधिवेशनाच्या तयारीसाठी म्हणून आयोजित केलेल्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज उपस्थित होते त्यांनी संपूर्ण अधिवेशनाचे तयारी व इतर बाबींची माहिती घेतली तसेच या अधिवेशनासाठी म्हणून राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

अजित दादा पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये हे अधिवेशन होत असल्याने हा पिंपरी चिंचवड शहराचा गौरव आहे असे उद्गार यावेळी काढले. अधिवेशन कोठे होत आहे त्या स्थळाबाबतची माहिती पत्रकारांच्या निवास व्यवस्थेबाबत ची माहिती तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती अजित पवार यांनी यावेळी घेतली. या बैठकीस पिंपरी चे आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे पाटील , मंगला कदम, प्रशांत शितोळे, विठ्ठल उर्फ नाना काटे , कार्याध्यक्ष राहुल भोसले, राष्ट्रवादी पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, संतोष बारणे ,माया बारणे, माई काटे, राजेंद्र जगताप, राजाभाऊ बनसोडे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.

पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले ज्येष्ठ पत्रकार व अधिवेशन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे राज्य पत्रकार परिषदेचे निरीक्षक श्रीराम कुमठेकर, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवे, श्रावणी कामत तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *