आळे ग्रामपंचायतीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर

६ डिसेंबर २०२१

आळेफाटा


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आळे (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. सरपंच प्रीतम काळे तसेच प्रबुद्ध युवक संघ आळे चे अध्यक्ष नितीन बद्रिके यांनी महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देऊन अभिवादन केले.
तसेच यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी सरपंच प्रितम काळे, प्रबुध्द युवक संघ आळे चे अध्यक्ष नितीन भद्रिगे,विजय भदिगे,कैलास भदिगे,सखाराम भंडलकर,सदस्य ग्रामपंचायत आळे, किरण भदिगे,
तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *