दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा पराभव

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


संजू सॅमसनच्या ६३ चेंडूंत नाबाद ८६ धावा दमदार खेळीनंतरही गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेने या सामन्यात नऊ धावांनी निसटता विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

लखनऊ येथे झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे सामना निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरु झाला. त्यामुळे सामना ४०-४० षटकांचा करण्यात आला. भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यानंतर आफ्रिकेने ४ बाद २४९ अशी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात भारताला ४० षटकांत ८ बाद २४० धावांपर्यंतच पोहोचता आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *