पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व्हरवर अज्ञानांकडून परदेशातून सायबर हल्ला…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि. १० मार्च २०२१ :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत निगडी येथील व्यापारी संकूल येथे मे.टेक महिन्द्रा लि. व त्यांचे भागीदार पार्टनर यांचे मार्फत Integrated Command Control Centre and Data Centre तयार करणेत येत आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मिशन (पॅनसिटी) प्रकल्पांतर्गातील विविध प्रकारच्या देण्यात येणा-या सेवा उदा. सिटी नेटवर्क, स्मार्ट वॉटर, स्मार्ट सिवरेज, स्मार्ट ट्रॅफिक, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट एन्हार्नमेंट, सिटी सर्व्हायल्न्स इ.कामकाजाचा समावेश आहे. सदरचे कामकाजासाठी स्मार्ट आय.ओ.टी. डिव्हायस बसविणेत येणार आहेत व त्यांचा सर्व डेटा हा Integrated Command Control Centre and Data Centre या ठिकाणी एकत्रित होणार आहे.

त्याबाबतचे कामकाज मे.टेक महिन्द्रा लि. Installation चे कामकाज सुरू असताना दि.२६/०२/२०२१ रोजी सकाळी ११.१५ वाजता स्मार्ट सिटीचे Integrated Command Control Centre and Data Centre येथे अज्ञातांकडून रनसमवेअर (सायबर हल्ला) झालेला आहे. त्यामध्ये डेटा सेंटरमधील एकूण २७ सर्व्हर इन्फेक्टेड झालेले असून सद्य:स्थितीत सदरचे सर्व्हर बंद करून ठेवलेले आहेत.

सदरचे सायबर हल्यामुळे २७ सर्व्हरमधील सर्व डेटा इन्फेक्टेड झालेला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज हे प्राथमिक स्वरूपात सुरू होते. स्मार्ट इलिमेंटस् चालू नसल्याने ते Integrated Command Control Centre and Data Centre याठिकाणी डेटा जात नव्हता त्यामुळे स्मार्ट सिटीचा कोणताही डेटा नष्ट झालेला नाही. जो काही डेटा नष्ट झालेला आहे, त्यामुध्ये सर्व्हर कॉन्फ्युगरेशन चा डेटा गेलेला आहे. सदर सायबर हल्यामुळे सदरचे Integrated Command Control Centre and Data Centre सुरू ( Go live ) होण्यासाठी एक महिना उशिर होणार आहे व सदरचे सर्व २७ सर्व्हर परत सुरू करणे व त्याकरीता आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करणे व त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरीग पुणे यांचेमार्फत टेस्टींग व Cert in panel संस्थेकडून मे.टेक महिन्द्रा लि. यांनी implement केलेल्या यंत्रणाबाबत अहवाल घेण्यात आल्यानंतरच पुढील कामकाज सुरू होईल.

सदरकामी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. चे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही फक्त सदरचे २७ सर्व्हर पुन्हा इन्टॉलेशन करणेकामी मे.टेक महिन्द्रा लि. यांचा एक महिना कालावधी जाणार आहे. त्याबाबत रितसर निगडी पोलिस ठाणे येथे सायबर गुन्हा नोंदविणेत आलेला असून पोलिस यंत्रणा पुढील तपास करत आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. चे संचालक तथा सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *