माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उपस्थित..शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील, खा. डॉ. कोल्हे आदींची उपस्थिती

माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उपस्थित

शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील, खासदार डॉ. कोल्हे आदींची उपस्थिती

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर येथे त्यांच्या शेतात झालेल्या अंत्यविधी प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार विलास लांडे, पोपटराव गावडे, बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, दिलीप ढमढेरे, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर तसेच अनेक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, आजी-माजी शासकीय अधिकारी व ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान वल्लभ बेनके यांचे रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव शरीर नारायणगाव येथील त्यांच्या बंगल्यावर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे मूळ गाव हिवरे बुद्रुक येथे अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले दुपारी चार वाजता आमदार अतुल बेनके यांनी अग्नीडाग देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.


दरम्यान त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी, आमदार बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, सभापती संजय काळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलीप भुजबळ, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, अनिलतात्या मेहेर, ज्ञानेश्वर खंडागळे, किशोरशेठ दांगट, संजय पानसरे, देवदत्त निकम, पूर्वा वळसे पाटील, उज्वला शेवाळे, संतोषनाना खैरे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, सुजित खैरे, उपसरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, सुरज वाजगे, मकरंद पाटे, अनेक विभागाचे आजी-माजी शासकीय पदाधिकारी तसेच सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक अबाल वृद्ध महिला भगिनी यांना अतिव दुःख झाले होते. अनेकांनी वल्लभ बेनके यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली. नारायणगाव, जुन्नर, ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली.

चौकट..
माजी आमदार स्वर्गीय वल्लभ बेनके यांचा मोठा परिवार असून त्यांच्या पक्षात पत्नी राजश्री बेनके, ज्येष्ठ चिरंजीव डॉ अमोल बेनके, आमदार अतुल बेनके व उद्योजक अमित बेनके असे तीन पुत्र आहे. तीन सुना, नातवंडे, जेष्ठ भाऊ शेतकरी नेते तानाजी बेनके, दुसरे बंधू प्राध्यापक सुधीर बेनके व नातेवाईक सगळे सोयरे असा मोठा परिवार आहे.
आमदार बेनके हे चार वेळा जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी दहा वर्ष कामकाज पाहिले. शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील आपल्या मनोगतात माजी आमदार बेनके यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *