पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे किंमती मुद्देमाल मुळ मालकांस प्रदान कार्यक्रम संपन्न

दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांचे संकल्पनेतून माला विरुद्धचे गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला. सदर समारंभात एकुण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुद्दमाल परत करण्यात आला.

या कार्यक्रमात संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकुण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकुण ४८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची एकुण किंमत रु.२१,३७,१४०/- तसेच २ चारचाकी वाहने किंमत रु.२५,५०,०००/-, २२ मोटारसायकल किंमत रु.८,७०,०००/-, ६९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन किंमत रु.१४,८८,८९०/- विविध कंपन्यांमधुन चोरीस गेलेला मुद्देमाल व ३ लॅपटॉप एकुण किंमत रु.१,२३,१८,६८१/- तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधुन जप्त केलेली रोख रक्कम रु.४८,९४,०००/- असा एकुण रक्कम रु. २,४२,५९,३६१/- (दोन कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकसष्ट रुपये) किंमतीचा मुद्देमाल मुळ मालकांना मा. पोलीस आयुक्त साो. यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे पोलीस आयुक्त साो, विनय कुमार चौबे यांचे कार्यकाळात दुस-यांदा हा कार्यक्रम पार पडला. यापुर्वी दि.१०.०१.२०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधुन मा. पोलीस आयुक्त साो. यांचे शुभहस्ते वेगवेगळ्या ८४ गुन्ह्यांतील सुमारे १,४६,९३,७०५/- (एक कोटी सेहचाळीस लाख त्र्यान्नव हजार सातशे पाच रुपये) किंमतीचा मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादींना परत करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त साो. यांनी या प्रसंगी फिर्यादीना उद्देशून तुमच्या चेह-यावरचा आनंद पाहुन पोलीस अधिकारी म्हणुन आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली. तसेच यापुढे देखील असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातील जेणे करुन जनतेचे मनोबल वाढेल व अधिकाधिक फिर्यादी पुढे होवनु पोलीसांकडे आपल्या तक्रारी दाखल करतील असे मनोगत व्यक्त केले. तसेच ज्या पोलीस अधिका-यांनी सदर गन्ह्यांचा तपास करुन मुद्देमाल हस्तगत केला त्यांचे अभिनंदन देखील केले. तसेच श्री. संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस अधिका-यांचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्यांना आपला मुद्देमाल परत मिळाला अशा काही फिर्यादींनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले
याच बातमीचा आढावा घेतला आहे,आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाहुयात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *