अखेर खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ नोव्हेंबर २०२२


जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.

गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. २ लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *