प्रभाग क्रमांक 13 मध्ये जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व वॉचमन कॉर्टर नविन कामाला सुरवात

निगडी दि ५ जानेवारी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यमुनानगर येथील श्री सदगुरु दत्त उद्यानात जे जुने जीर्ण वॉचमन साठी चे घर होते ते पाडुन त्या जागेवर नविन सुसज्ज वॉचमन कॉर्टर व जेष्ठ नागरिकांसाठी व्यायाम व्हावा व त्यांना गप्पा मारने, विविध सामाजिक कार्यक्रम घेणे, चर्चा सत्र , छोटे खाणी कार्यक्रम होण्यासाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात यावे अशी कल्पना समोर आली आणि त्यासाठी या प्रभागाचे नेतृत्व करणारे सर्वपक्षीय सन्मानीय नगरसेवक, नगरसेविका एकत्र येऊन याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जेष्ठ नगरसेविका सुमनताई पवळे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. नगरसेवक सचिन चिखले, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, आणि प्रभागातील जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन चिखले यांनी मनोगत वेक्त केले तर क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.