शिवसेना फोडायची तयारी दोन-अडीच वर्षांपासून सुरू होती – चंद्रकांत पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मी दोन-अडीच वर्षांपासून आपले सरकार येईल, असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. काही ना काही संदर्भ माझ्या मनात होते. त्याची योजना माझ्या मनात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असेही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *