नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) नारायणगाव येथील बागलोहरे गावठाण परिसरात राहणाऱ्या प्रतिक सतीश अडसरे (वय २८) याने आपल्या राहत्या घरासमोर असलेल्या खोलीमध्ये एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या टाक्यांचा अवैध साठा केल्याबद्दल त्याच्यावर नारायणगाव पोलिसांनी आज कारवाई केली. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपनीय खबऱ्यामार्फत प्रतीक अडसरे हा त्याच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या वाहनांमध्ये एलपीजी गॅस भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्याच्या घरासमोर एका मारुती कंपनीच्या ओमिनी गाडी मध्ये एक जण एलपीजी गॅस सिलेंडर उलटा करून त्याला बेकायदेशीर पाईप जोडून इलेक्ट्रिक मोटर च्या साह्याने वाहनांमध्ये असलेल्या गॅसच्या टाकी मध्ये गॅस भरत असलेला दिसला. त्यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने तेथे छापा घातला.
यावेळी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या प्रतीक अडसरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कोणताही सरकारी परवाना नसताना अवैधरित्या एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅस टाक्यांचा अवैद्य साठा करून त्यामधून बेकायदेशीररित्या एलपीजी गॅस त्याच्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन गाड्यांमध्ये भरत होता.
याप्रकरणी त्याच्याकडून २७ एचपी गॅस टाक्या, इलेक्ट्रिक मोटर, एक गॅस भरण्यासाठी बॅटरीवर चालणारा पंप, एक वजन काटा हे साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपीवर जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ यानुसार कारवाई करण्यात आली.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस नाईक शेख, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, सचिन कोबल, टाव्हरे यांच्या पथकाने केली.
भाजपचा जेष्ठ कार्यकर्ता कोरोनाने निखळला, प्रमोद निसळ कालवश…
रोहित खर्गेविभागीय संपादक पिंपरी दि ६ मे २०२१पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे माजी शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांचे आज…