नवरात्रोत्सवा निमित्त जि.प.प्राथमिक शाळा बस्ती येथे विविध उपक्रम साजरे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०५ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे . शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. या अनुषंगाने बस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींचे कन्या पूजन व औक्षण तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामधून सामाजिक संदेश देण्यात आला – “बेटी बचाओ बेटी पढाओ.” शालेय विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या मातांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी हेल्थ इज वेल्थ ही संकल्पना राबविण्यात आली . त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय पूरक आहार सप्ताह अंतर्गत हेल्दी डायट आणि आरोग्य यावर माहिती दिली. आहारामध्ये प्रथिनयुक्त डाळी, मोड आलेले कडधान्ये, भाज्या, फळे, दूध, हिरव्या पालेभाज्या असा सर्व समावेशक चौरस आहार असावा. तसेच सोबतीला दररोज योगा, प्राणायाम ,चालणे आणि मेडिटेशन असावे. त्यामुळे आरोग्य उत्साही व आनंदी राहते. मनावरील ताण हलका होऊन मन एकाग्र होते. अशी माहिती शाळेच्या शिक्षिका संगिता ढमाले यांनी दिली.

महिलांसाठी मातांसाठी मोफत आरोग्य शिबीर

प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील आरोग्य कर्मचारी डी.के.गोसावी, दिपाली पारखे, रजत गोरडे, तनुजा वरपे यांनी गावातील सर्व महिलांसाठी मातांसाठी मोफत आरोग्य कॅम्प आयोजित करून बीपी ,शुगर ,थायरॉईड, एच.बी.आणि डायबिटीस यासारख्या आजारांची तपासणी करण्यात आली. बस्ती गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. त्यानिमित्त कर्तुत्ववान मातांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला . आरोग्य परिचारिका व आशा वर्कर, ग्रामसेविका नूतन चिंचपुरे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील दोन्ही शिक्षकांनी केले. आभार मुख्याध्यापिका सीमा हांडे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *