साताऱ्यात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

०४ ऑक्टोबर २०२२

सातारा


सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी जवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्‍यावेळी बिबट्याचा मृत्यू झाल्‍याचे निष्‍पन्न झाले. हा बिबट्या नर जातीचा असून, त्‍याचे वय अंदाजे दोन वर्ष आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्‍याला तात्काळ गाडीत घालून शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या वैद्यकीय विभागात पाठवले.

अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्गापर्यंत या बिबट्याचा आधिवास होता. रात्री शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा. यामध्ये वाहनाच्या धडकेत त्‍याचा मृत्‍यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.