शरद पवार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार – एकनाथ खडसे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑक्टोबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबत मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाहांनी एकनाथ खडसेंची भेट नाकारली, एकनाथ खडसे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.

मी शरद पवार यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मी भेट घेणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय विषय नाही, अन्य एका विषयासंदर्भात मला दोघांशीही चर्चा करायची आहे. अमित शाहांना भेटायला जाताना शरद पवारच माझ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे मी भाजपात जाणार आहे, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी ५० खोके घेऊन दुसऱ्या पक्षात जाणारा माणूस नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *