दसरा मेळाव्याबाबत त्यांना काय वाटतं हे कोणीही विचारलं आहे का? – किशोरी पेडणेकर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०३ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेतील बंडाखोरी नंतर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे दोन ठिकाणी वेगवेगळे दसरा मेळावे होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत असल्यामुळे मी समाधानी नाही. शेकडो केसेस आम्ही अंगावर घेतल्या. किती तरी यातना आम्ही भोगल्या.या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे भगवे झेंडे आणि बाळासाहेबांचे फोटो दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत असल्याने मला दुःख होत आहे. रामदास कदमांच्या या वक्तव्यला आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्त्युतर दिले आहे..

दसरा मेळाव्याबाबत त्यांना काय वाटतं हे कोणीही विचारलं आहे का? भर विधानसभेत ते बोलले होते, माझ्या मुलाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. मी इतेक वर्ष शिवसेनेत काम केलं. त्यामुळे मी समाधानी आहे. पण नंतर उलटे ढेकर देणारे हेच रामदास कदम होते. त्यामुळे त्यांनी जिथे जायचं तिथे जावं, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांवर केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *