नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप – मुख्यमंत्री शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
३० सप्टेंबर २०२२


नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचेसह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप झाले. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *