नागरिकांना बनावट लिंकवरून होणाऱ्या फसवणुकी बाबत,पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे आवाहन..

पुणे : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
            तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सायबर गुन्हेगार इंटरनेटवर वेगवेगळया पध्दती वापरुन नागरिकांची फसवणूक करत आहेत. सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांच्या विविध पध्दतीचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले आहे की, सायबर गुन्हेगारांनी गुन्हे करण्याचे
खालीलप्रमाणे मार्ग शोधले आहेत –
सध्या व्हॉट्स अँपवर  एक लिंक फिरत आहे सदर लिक हि नामांकित सुपरमार्केट DMart यांची असल्याचे भासवून त्यांच्या २० व्या वर्धापन दिनानिमित, ग्राहकांना मोफत भेटवस्तू देण्याचा दावा करणारी बनावट लिंक, संदेश व्हॉटसप अँपवर फॉरवर्ड केले जात आहेत.

सदर बनावट लिंकवर क्लिक केल्यास, एक वेबपेज उघडते ४ प्रश्न विचारले जातात जसे कि तुम्ही DMart ला ओळाखता का? तुम्ही कोणत्या वयोगटात बसता? तुम्हाला Dmart कसे वाटते?
अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. किवा एक’ स्पिन व्हील’ दिले जाते ते फिरवल्यास एक पॉपअप
येतो त्यात तुम्ही ५०००/- रुपये पर्यंतचे गिफ्ट कार्ड तसेच काही वस्तू जिंकला आहात असे भासवून
सदर स्पर्धा इतर मित्रांसह व्हॉटसप अँपवर ५ ग्रुप तसेच २० मित्रांसोबत शेअर करा असे सांगितले जाते,
स्क्रीन वरील ब्लू बार पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्यांने शेअर करत राहणे आवश्यक आहे असे सांगून आपणाकडून आपल्या बँक विषयी गोपनीय माहिती विचारू शकतात ज्यामुळे आर्थिक फसवणूक होवू शकते.
तरी सदरबाबत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांना पुणे ग्रामीण पोलीसांतर्फे आवाहन करण्यात येते की, यासारख्या फसव्या लिंक ओपन कर नये, आपला ओटीपी शेअर करु नये,अनोळखी अँप डाऊनलोड करू नये, अनोळखी फोनकॉलवर स्वत:ची कोणतीही माहिती देवू नये. तसेच कोणतीही बँक
खात्याशी संबंधीत माहिती जसे का, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. माहिती मागत असल्यास सदरची
गोपनीय माहिती कोणासही देऊ नये. तसेच समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणतेही अँप्लीकेशन
डाऊनलोड करु नये, तसेच स्वताच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इ. या खात्याचा पासवर्ड स्वत:चा मोबाईल क्रमांक न ठेवता तो अंक/अक्षरे/चिन्ह असलेल्या स्वरूपात ठेवावा. अशी महत्वाची माहिती पुणे ग्रामिण पोलिसां मार्फत देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *