मोटारीला जोडलेल्या इलेक्ट्रीक वायरीचा शॉक लागून घोडेगाव येथील २८ वर्षीय युवकाचा मृत्यु


घोडेगाव : –
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस मोटारीला जोडलेल्या इलेक्ट्रीक वायरीला शॉक लागून एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार दि०३ रोजी सायं ५:१५ वा.च्या सुमारास घोडेगाव ता. आंबेगाव येथे घडली. त्याला उपचारासाठी घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले.डॉक्टरांनी त्यास तपासुन उपचारापुर्वी मयत घोषित केले.अशी माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनकडुन मिळाली.अमोल गौतम वाघमारे ( वय २८ ) वर्ष असे संबंधित मृत्यु झालेल्या युवकाचे नाव असुन आडिवरे येथे हगांमी अरोग्य कर्मचारीचे काम तो करत होता. घोडेगाव वार्ड क्रमांक ४ येथील सामाजिक कार्यकर्ता तसेच भिमशक्ती संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्याची ओळख आहे.त्याच्या पश्चांत पत्नी , वडील ,आई , भाऊ असा परिवार आहे. कर्ता व्यक्ती गेल्याने,कुटूंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार , खबर देणारे ,तुषार संभाजी दौड त्यांच्या शेतात शेळी पाहण्यासाठी गेले असता त्यांना मयत अमोल गौतम वाघमारे रा. घोडेगाव मारुड पांधी ( शेवगा ).ता आंबेगाव जि. पुणे हा त्यांचे घराच्या पाठीमागील बाजूस त्यांच्या शेतात पाणी देण्याच्या मोटारी जवळ पडलेल्या अवस्थेत दिसला असता, खबर देणारे व अजय भरत वाघमारे असे दोघांनी जावुन बघितले असता अमोल वाघमारे यांच्या हातात इलेक्ट्रीक वायर दिसली त्यामुळे इलेक्ट्रीक शॉक लागल्याचे, त्यांच्या निर्दशणास आल्याने, ताबडतोब सदर वायरीचा घरातील स्वीच बंद करण्यात आला व घडलेली घटना त्यांच्या आई व वडीलांना सांगितली असता, त्यानंतर घोडेगाव ग्रामिण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यास तपासून उपचारापुर्वी मयत घोषित केले अशी नोंद घोडेगाव पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून पुढील तपास सहा फौजदार एन एम वायाळ हे करत आहे अशी माहिती घोडेगावचे प्रभारी साहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *