देवीचे दर्शन घेण्यास कोणालाही बंदी नाही; रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
३० सप्टेंबर २०२२


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या. येथे रश्मी ठाकरे यांनी देवीची महाआरती केली. यावेळी रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रश्मी ठाकरेंनी केलेल्या महाआरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवीचे दर्शन घेण्यास कोणालाही बंदी नाही. दर्शन सर्वांनीच घेतले पाहिजे. त्यांनीही देवीचे दर्शन घेतले असेल तर चांगलीच बाब आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

रश्मी ठाकरे संजय राऊतांच्या घरी, टेंभी नाका देवीच्या दर्शनाहून परतताना राऊत कुटुंबाची भेट

महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.तसेच, त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबाची भेट घेतली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *