काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम आहेत – उद्धव ठाकरे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
३० सप्टेंबर २०२२


शिरुर मतदारसंघातील काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम आहेत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील नेते आढळराव पाटील यांना टोला लगावला.

नाव एक आणि करायचं दुसरंच, असा हा प्रकार झाला. शिरुर मतदारसंघात शिवनेरी किल्ला आहे. या किल्ल्याच्या नावाला बट्टा लागणे हा शिवसेनेचा अपमान आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत. शिरुर मतदारसंघातील शिवसैनिकांनी गुरुवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या आवारात या सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *