आंबेगाव तालुक्यात महिला बचत गटांद्वारे घराजवळील मोकळ्या जागेत सेंद्रिय भाजीपाला पिकविण्याच्या मोहिमेला जोरात सुरवात : कुमार घोलप

     घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी   
            यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगावच्या माध्यमातून महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचे काम गेल्या २१ वर्षांपासून सुरु आहे .
त्याचाच एक भाग म्हणून महिला व तिच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे. विशेषतः लहान मुले , किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता यांचे आरोग्य चांगले रहावे तसेच विविध प्रकारचा “विषमुक्त भाजीपाला” आपल्या आहारात घेऊन आरोग्यावर होणार खर्च कमी करून एक प्रकारे बचत व्हावी. तसेच महिला आणि लहान मुलांचे कुपोषण दूर व्हावे. थोडा फार भाजीपाला विकून कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा, तसेच रोज आपल्या कुटुंबात खाण्यासाठी ताजा भाजीपाला मिळावा. या विविध उद्देशाने “माझी पोषण परसबाग” हि विशेष मोहीम संघामार्फत आंबेगाव तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांसोबत राबविली जाणार आहे. अशी माहिती संघाचे व्यवस्थापक कुमार घोलप यांनी दिली.


   यासाठी संघामार्फत मोफत मार्गदर्शन व बियाणे दिले जाणार आहे . २००० महिलांनी परसबाग करण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे. कोरोना या आजाराच्या महामारीमुळे बाजारात भाजीपाला आणायला जायला भीती वाटते. किंवा तो जास्त बाजार भावाने मिळतो त्यामुळे लोक भीतीने देखील घेण्यास टाळाटाळ करत आहेत.  म्हणून आपल्याच घराच्या जवळपास भाजीपाला तयार व्हावा यासाठी संघाचे पदाधिकारी योगिता बोऱ्हाडे,अलका डोंगरे,अलका घोडेकर, ललिता वरपे, कार्यकर्ते कल्पना एरंडे , सुहास वाघ, हरिभाऊ गेंगजे, सीमा कानडे व शिवाजी शेटे परिश्रम घेत आहेत . सध्या बाजारात उपलब्ध असणारा भाजीपाला शरीराला घातक अश्या असंख्य रासायनिक खत व औषधांपासून पिकविला जातो. ज्यामुळे प्रत्येक कुटुंबात नवनवीन आजार वाढत आहेत. हे टाळण्यासाठी घराजवळील छोट्याश्या जागेत किंवा घराच्या टेरेसवर भाजीपाला पिकविला जाणार आहे.

Advertise


पोषणबाग फुलविताना कोणत्याही केमिकल औषधाचा वापर न करता पारंपरिक खते , व औषधे म्हणजेच जीवामृत, घना