मॉडर्नच्या चार खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रामदास सांगळे
विभागीय संपादक, जुन्नर
२७ सप्टेंबर २०२२

बेल्हे


जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत बेल्हे (ता.जुन्नर) येथील चार विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा धुळे व ग्रॅपलिंग कुस्ती कमिटी ऑफ महाराष्ट्र यांनी धुळे येथे आयोजीत केलेल्या ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यातील २० जिल्हे सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये एकूण ३६० खेळाडूचा सहभाग होता.

बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बेल्हे येथील चार विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी करत उत्तरप्रदेश मधील आयोद्या येथे होण्याऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये ३९ किलो वजनी गटात -अथर्व अशोक सुपे (रौप्य पदक), ४७ किलो वजनी गटात -यश सचिन वाघुले (रौप्य पदक), ५८ किलो वजनी गटात – सोहम पंकज लामखडे (रौप्य पदक), ५८ किलो- सुयश सोमनाथ पाबळे (कास्य पदक ) अशी कामगिरी केली. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सुरेश काकडे व योगेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.


संस्थेचे संस्थापक सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे,शाळेच्या प्राचार्य विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसेबसर्व संचालक मंडळ,आपला आवाज चे विभागीय संपादक रामदास सांगळे,शाळेतील शिक्षक, पालकांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *