महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जुन्नर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२७ सप्टेंबर २०२२

जुन्नर


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा देशातील सर्वात मोठा पत्रकार संघ असून प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे,संघटक संजय भोकरे व प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली या संघाची प्रगतीचा आलेख चढता झालेला दिसून येतो आहे. या संघाच्या माध्यमातून तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी पत्रकार सदस्यांतून राज्याच्या व देशाच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात.याशिवाय पत्रकार सदस्यांना त्यांच्या सुखदुःखात योग्य मदत करीत असतात.ही कार्यकारिणी लोकशाही मार्गाने निवडण्यात येते.


सोमवार दि. २६सप्टेंबर रोजी जुन्नर येथील शासकीय विश्राम गृहात जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर,जिल्हा संपर्कप्रमुख अशोक डेरे,मनोहर हिंगणे यांनी ही जुन्नर कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात यशस्वी भूमिका पार पाडली.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे –

तालुकाध्यक्ष:– राजेश डोके, कार्याध्यक्ष:-भरत अस्वार, उपाध्यक्ष:-कैलास बोडके, विकास गडगे,फुलसुंदर महाराज
सचिव:- गोपीनाथ शिंदे,सहसचिव
रमेश बेळे,खजिनदार:- दादा रोकडे, रजिस्ट्रार:-विजय चाळक,
पवन गाडेकर:- वृत्तवाहिनी संघ प्रमुख
संपर्कप्रमुख:- किशोर चौरे
प्रसिद्धी प्रमुख:- रवी गजे, सल्लागार:-विठ्ठल शितोळे, शिवाजी अस्वार
सदस्य कार्यकारिणी:- मंगेश रत्नाकर,बापू रसाळे,दिपक मंडलिक,नितीन कांबळे,अनिस सय्यद,रामदास सांगळे व दुष्यांत बनकर

अशी असून संघातील सर्व पत्रकार मित्रांनी संघाची ध्येयधोरणे सांभाळून व पत्रकार हित लक्ष्यात घेऊन संघ वाढीसाठी प्रयत्नशील रहावे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळून काम करीत रहावे असे मनोगत डॉ.विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले.

यावेळी जुन्नर तालुका नूतन कार्यकारिणीचा सत्कार प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांचे हस्ते करण्यात आला यावेळी आमदार अतुल बेनके,इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्ष अतुल परदेशी,पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर, जिल्हा संपर्कप्रमुख अशोक डेरे, मनोहर हिंगणे यांनी नूतन कार्यकारिणीचे हार्दिक अभिनंदन करून पुढील काळात चांगले समाजपयोगी कार्यक्रम राबवून संघाची प्रतिमा उज्वल करावी अशा शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *