जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघ राज्यात प्रथम

२७ सप्टेंबर २०२२
जुन्नर प्रतिनीधी


महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अहमदनगर व पुणे जिल्हा उत्तर कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिर्डी ता:-रहाता येथे नुकतीच संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष, “दैनिक “पेपर विक्रेता राजेश नागुजी डोके व सर्व सभासद यांचा प्रथम क्रमांक घोषित केला. याबाबत याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे –

जुन्नर तालुका अध्यक्ष ,सभासद व पदाधिकारी यांनी चांगले योगदान दिले,सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या हिताचे काम केले आहे,संघ वाढीसाठी प्रयत्न केले,संघाला विकासात्मक नावलौकिक मिळवून दिला,संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी व पत्रकार हित जोपासणारे कार्यक्रम आयोजित केले व पत्रकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचा जाहीर केल्यानुसार प्रथम क्रमांक या संघाला मिळाला असे प्रदेश राज्य सरचिटणीस आरोग्य यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची घोषणा

जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या नियोजयानुसार व पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष राजेश नागुजी डोके यांनी संघाचे उत्कृष्ट काम करून प्रथम क्रमांक पटकावला व अकरा हजार रुपये ,साईबाबांच्या शाल, श्रीफळ,पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .यावेळी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या वतीने मंगळग्रह देवाची प्रतिमा, आरती व माहिती पुस्तिका देऊन गौरविण्यात आले.या सत्कार समारंभ प्रसंगी अमळनेर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले,जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष एस.एन.पाटील,रवींद्र बोरसे,अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष,सर्व तालुकाध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सचिव,सर्वं संपर्कप्रमुख,तसेच सर्व प्रिंट मीडिया पत्रकार,सोशल मीडिया पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिर्डी येथील कार्यकारणी च्या महत्वाच्या बैठकीत राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी केली घोषणा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार पुणे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र भोर ,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक डेरे,तालुकाध्यक्ष राजेश डोके,तालुका सचिव गोपीनाथ शिंदे यांनी अमेरिका युनिव्हर्सिटी पीएचडी प्राप्त व संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते स्वीकारला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *