अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे उपचार घेत असताना मुंबईच्या रुग्णालयात निधन

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर (पुणे) : दि. ११/०२/२०२३

 

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, तथा महानगर बँकेचे सर्वेसर्वा व अध्यक्ष उदय शेळके, यांचे दीर्घ आजारानंतर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झालेय. त्यामुळे मुळचे पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन चे असणारे उदय शेळके(वय वर्ष ४६), यांच्या अकस्मात मृत्यूमुळे पारनेर तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एक नामवंत बँक म्हणून ओळख असणाऱ्या व त्यांच्याच वडिलांनी म्हणजेच गुलाबराव शेळके यांनी स्थापन केलेल्या, जी. एस. महानगर को ऑपरेटिव्ह बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.
काही दिवसांपासून ते आजारी असल्याने, त्यांना मुंबई येथील लीलावती या सुप्रसिद्ध व अद्ययावत रुग्णालयात उपचारासाठी ठेवलेले होते. परंतु अखेर त्यांनी त्याच रुग्णालयात आपला शेवटचा श्वास घेतला.
उदय शेळके यांच्या जाण्याने पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे तसेच त्यांची पोकळी कधीही भरून न निघणार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडिया वर अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात.
त्यांच्या मृत्यूची खबर समजताच राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केलाय.
तसेच राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पा., माजी मंत्री जयंत पाटील, शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार, काँग्रेसचे आय पक्षाचे माजी जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शोक व्यक्त केलाय.
वडिलांच्या नंतर स्वतःच्या सहकारी बँकेच्या माध्यमातून सहकारी बँकिंग क्षेत्रात, उदय शेळके यांनी जी भरीव कामगिरी केली होती, त्यामुळेच त्यांना अहमदनगर जिल्हा सहकारी बँके सारख्या एका मोठ्या सहकारी बँकेचे चेअरमनपद, विरोधीपक्ष नेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देऊन पारनेर तालुक्याच्या लौकिकात भर टाकली. परंतु शेळके यांचा आकस्मिक एक्झिट हा सर्वांच्याच मनाला चटका लावणारी गोष्ट आहे.
त्यांच्या पछयात आई, पत्नी व दोन मुली आहेत.
उदय शेळके यांच्यावर अंतिम संस्कार रविवार दि. १२/०२/२०२३ रोजी, पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे सकाळी ११.०० वा. होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आपला आवाज न्यूज नेटवर्क व केबल टिव्ही चॅनेल कडून, स्व. उदय गुलाबराव शेळके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *