पत्रकार बजरंग राजीवडे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन…

पिंपरी दि ८ एप्रिल २०२१
दिलदार मित्र पत्रकार बजरंग राजीवडे वय ४२ यांचे ह्रदयविकाराच्या धक्याने आज (गुरुवारी) निधन झाले आहे. त्यांचे वय ४२ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मावळ तालुक्यातील रहिवासी असलेले पत्रकार बजरंग राजीवडे यांनी दैनिक पुण्यनगरीत काम केले. सध्या ते बातम्यांचे संकेतस्थळ चालवत होते. त्यांना चित्रपटाची आवड होती. एका मराठी सिनेमात भूमिका केली. त्यांनी दोन शॉर्ट फिल्मची निर्मिती केली होती. सतत हसतमुख आणि मनमिळावू होते.

सोमवारी दिवसांपूर्वी दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना पॅरॅलीसीसचा झटका आला होता. त्यांच्यावर कासारवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना त्या हॉस्पिटलमधून निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले असता उपचारादरम्यान आज त्यांना ह्रदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मावळातील चांदखेड शेजारील दीवड गावात आज रात्री नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आपला आवाजकडून भावपुर्ण श्रद्धांजली.