महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२७ सप्टेंबर २०२२


सदस्याच्या अपात्रतेचा मुद्दा निवडणूक चिन्हाशी संबंधित नाही
राजकीय पक्षाच्या सदस्याच्या अपात्रतेचा मुद्दा निवडणूक आयोगासमोरील निवडणूक चिन्हाच्या कार्यवाहीशी कोणताही संबंध नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुंबई पालिका निवडणुकीला स्थगिती, ठाकरे गटाचा दावा शिंदे गटाने फेटाळला
मुंबई पालिका निवडणुकीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी केला. यावर खंडपीठाने कोणत्या आधारे ही स्थगिती आहे अशी विचारणा केली. यावर शिंदे गटाच्या वकिलांनी कोणतीही स्थगिती नसल्याचं सांगितलं. महेश जेठमलानी यांनी हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असून, याच्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

ठाकरे गटाला प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाकडे का यायचं आहे? शिंदे गटाची विचारणा
जेव्हा निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोण हे तपासण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सांगितलं, तेव्हा ते कोर्टात येतात आणि निवडणूक आयोगाने पुढे जाऊ नये अशी मागणी करतात. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून दिला. यामध्ये मनाईसंबंधी आदेश नव्हता. नोटीसदेखील जारी करण्यात आली नव्हती असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला आहे. यांना प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाकडे का यायचं आहे? अशी विचारणाही त्यांनी केली.

निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार
घटनात्मक संस्था असल्याने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाच्यावतीने कौल यांनी केला आहे. विधीमंडळ आणि राजकीय बहुमत विचार घेण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही
पक्षाचं चिन्ह ही काही आमदारांची संपत्ती नाही, हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. पण आमच्याकडे तो वापरण्याचा कायदेशीर अधिकार आहे असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला आहे

पक्षाच्या फुटीबाबत निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही
पक्षाच्या फुटीबाबत निर्णयाचा अधिकार विधानसक्षा अध्यक्षांना नाही असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा १० व्या सूचीचा उल्लेख केला आहे.

तर विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाकडे जाणार नाहीत
विधानसक्षा अध्यक्ष नेहमी नेत्याशी संवाद साधतात, जे सभागृहाचे सदस्य असतात. व्हीपमध्ये बदल झाल्यास अध्यक्ष नेत्याला विचारणा करतील, ते राजकीय पक्षाकडे जाणार नाहीत असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.

उद्धव ठाकरेंचा बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा
शिंदे गटाच्या वकीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहातील बहुमत गमावल्याचा हा मोठा पुरावा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबत अनेक प्रश्न मिटले, जेठमलानी यांचा युक्तिवाद
आमदारांची अपात्रता आणि पक्षातील अंतर्गत वादावरील निवडणूक आयोगाचे अधिकार यांच्यातील संभाव्य संबंध मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबत संपले आहेत असाही युक्तिवाद त्यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *