शेतकरी आंदोलनास साहित्यिकांबरोबर WWF फेम खलीचाही पाठिंबा

बातमीदार – रोहित खर्गे, विभागीय संपादक

नवी दिल्ली दि ३ डिसेंम्बर, देशभरातून येऊन दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलनास विविध संघटना, राजकीय पक्ष याबरीबर साहित्यिकांनीही पाठिंबा दिला असून काल wwf फेम खलीनेही शेतकऱ्यांना भेटून आपला पाठींबा जाहीर केला.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता विधायके मंजूर केली. त्यामुळे मोठे भांडवलदार शेती वेवस्थेत उतरतील व छोट्या शेकऱ्यांना हद्दपार करतील. त्यामुळेच साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्यिक दिल्लीजवल सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनास येऊन पाठिंबा दर्शवला. त्यांच्याबरोबरच जागतिक खेळाडू रेसलर wwf फेम खालीनेही आपला पाठिंबा दर्शविला. नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी लढे दिले . व आम्ही आमचे कर्तव्य समजून या लढ्यासाठी पत्रक काढून पाठिंबा देत आहोत असे साहित्यिकांनी आपला पाठिंबा दर्शविला. जेष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या समवेत अनेक साहित्यिकांनी निवेदन काढले. केवळ सत्तेच्या जोरावर हे आंदोलन चिरडण्याचा हा प्रयत्न करणे अमनुषच नव्हे तर निषेधार्थ आहे. असे साहित्यिकांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचे हे आंदोलन हणून पडण्याचा व शेकऱ्यांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सरकारचा हा निष्फळ प्रयत्न आमच्या अभेद्य एकजुटीतून दाखवून देऊ तसेच संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन शेतीविषयक कायदे रद्द करावेत अशी आग्रही मागणी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी केली. विविध राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या सरकार बरोबर चर्चेच्या चार निष्फळ फेऱ्या झाल्या पण काहीच तोडगा निघाला नाही. कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही दिल्ली सोडणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *