महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२७ सप्टेंबर २०२२


शिंदे गटाकडे फक्त विलीनीकरणाचा एकमेव पर्याय
कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितलं की, शिंदे गटाकडे विलीनीकरणाचा एकमेव पर्याय आहे.

अपात्रतेसंबधी निर्णय आधी घ्यावा लागेल – सिब्बल
शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे जाऊन आपणच राजकीय पक्ष असल्याचं सांगितलं आहे. पण त्यांच्या पक्षातील सदस्यत्वासंबंधी कारवाई अद्याप प्रलंबित आहे, ज्याचा निर्णय आधी घ्यावा लागेल असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.

ठाकरे गटाकडून विचारणा
जरी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा असेल तर १९ जुलैच्या आधी पावलं उचचली तेव्हाच घ्यायला हवा होता. पण त्यापूर्वी त्यांनी पक्षाचे सदस्यत्व सोडले असेल तर ते निवडणूक आयोगाकडे कसे जाणार? अशी विचारणा कपिल सिब्बल यांनी केला आहे.

निकाल आमच्या बाजूने लागला तर काय होणार? ठाकरे गटाची विचारणा
कपिल सिब्बल यांनी आज निवडणूक आय़ोगाने कार्यवाही केली आणि सर्व याचिकांचा निर्णय आमच्या बाजूने लागला तर काय होणार? अशी विचारणा खंडपीठाला केली आहे.

अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग प्रतीक्षा का करू शकत नाही का?
शिंदे गटाला अपात्र घोषित केलं जाण्याची शक्यता असून ते बहुमताच्या आधारे गट स्थापन कसा काय करु शकतात? हे घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखे आहे. न्यायालयाकडून अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग प्रतीक्षा का करू शकत नाही का? असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.

ठाकरे गटाकडून सादिक अली प्रकरणाचा दाखला
अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात सादिक अली विरुद्ध निवडणूक आयोगाच्या प्रकरणाचा दाखला दिला आहे. १९७२ मधील काँग्रेस फुटीचं हे प्रकरणआहे. त्या निकालात कोर्टाने विधीमंडळ आणि राजकीय पक्ष दोन्हींचा विचार केला होता हे ठाकरे गटाने निदर्शनास आणून दिलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *