निळवंडे प्रकल्प, गोदावरी कालवा आणि कुकडी सिंचन प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२७ सप्टेंबर २०२२


अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प, गोदावरी कालवा आणि कुकडी सिंचन प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. यावेळी खा.डॉ.सुजय विखे-पाटील, खा.सदाशिव लोखंडे, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील पाणीप्रश्न पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण ठरली.

या बैठकीत खालीलप्रमाणे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले –

१) साकळाई उपसा सिंचन योजनेचे (श्रीगोंदा) सर्वेक्षण करावे.
२) कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोड बोगदा निविदा काढाव्यात.
३) निळवंडे प्रकल्पाला गती द्यावी.
४) वाभोरी चारी टप्पा- 2 प्रकल्पाला गती द्यावी.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *