गंगापूर बु येथे जागतिक महिलादिनानिमित्त बचटगटाच्या महिलांची महामारी विरुद्ध जाणजागृती…

आंबेगाव : – ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
विवाहपूर्व समुपदेशन – कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठीची गरज
  विवाहापूर्वी मुलं मुलींना समुपदेशन करणे हे कौटुंबिक व्यवस्था टिकविण्यासाठी काळाची गरज आहे. कौटुंबिक कलह, घटस्फोट याद्वारे संसार मोडण्याचे प्रमाण सध्याच्या काळात कमी करण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्राची खूप मोठी मदत होईल असे उद्गार गायत्री काळे मॅडम यांनी काढले.
   जागतिक महिला दिनानिमित्त गंगापूर बु. येथे यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव, प्रगती महिला विभाग व ग्रामपंचायत गंगापूर बु. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क,साबण व गुलाब पुष्प देऊन योग्य ती काळजी घेत आलेल्या सर्व महिलांचे कार्यक्रमात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमामध्ये गायत्री काळे यांनी विवाहपूर्व समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन केले. तर राजश्री कारंडे यांनी कौटुंबिक हिंसाचार व त्यापासून संरक्षण २००५ याविषयी माहिती दिली.
  यशवर्धिनी संघाचे व्यवस्थापक कुमार घोलप यांनी बचत गट कार्यप्रणाली आणि महत्व यावर मार्गदर्शन केले. तसेच संघाच्या मार्गदर्शनाखाली महिला कोणताही कार्यक्रम सहजपणे यशस्वी करून दाखवतात म्हणून महिलांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवारफेरीतून आरोग्यविषयक घोषणाच्या माध्यमातून जाणीवजागृती यामुळे सर्वांचे लक्ष वेधले.
  याप्रसंगी सरपंच रोहानी मधे, उपसरपंच राजेंद्र कोकणे, ग्रामसेवक जे. एस. बोर्डे, संभाजीराजे लोहोट, दीपक येवले, धनश्री आवटे अश्विनी वारे, अर्चना येवले संघाच्या अध्यक्षा  योगिता बोऱ्हाडे,अलका डोंगरे, अलका घोडेकर,सविता मुंढे , चंद्रभागा भास्कर, मदिना पटेल, विमल काळे, मंगल वाजे, लता बांगर, शकुंतला धादवड, अंजनाबाई येवले,आदी मान्यवर उपस्थित होते.
          यावेळी ११९ महिलांची शुगर, बीपी, हिमोग्लोबिन इत्यादी आरोग्य तपासणी सेवा इंटरनॅशनल पुणे यांच्यामार्फत मोफत करण्यात आली  
  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाचे कार्यकर्ते कल्पना एरंडे, सुहास वाघ, सीमा कानडे, हरिभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे यांनी परिश्रम घेतले.