गावकऱ्यांनी मुलांना वडिलांच्या अंत्यविधीपासून रोखले

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१३ ऑक्टोबर २०२२

आळेफाटा


आळे (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे ज्ञानमंदिर विद्यालयाचे माजी प्राचार्य यशवंत देवकर यांचे वृद्धापकाळ व आजारपणामुळे हृदय विकाराचा झटका आल्याने दुःखद निधन झाले. त्यांचे दोन मुलं डॉक्टर असून मुलगीही डॉक्टर आहे. मात्र देवकर सरांचा कडक शिस्तीचा स्वभाव आणि त्यांच्या रिटायर्डमेन्ट नंतर त्यांना मिळालेली सेवानिवृत्ती रक्कम त्यात घेतलेले त्यांनी फ्लॅट याबाबतीत टोकाचे वादविवाद होऊन सर्व गोष्टी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होण्यापर्यंत गेला. यामध्ये त्यांनी आपली सेवानिवृत्त शिक्षक पत्नी, सुशिक्षित डॉ असलेली मुलं यांच्या विरुद्ध गुन्हा ही दाखल केला होता. यामुळेच त्यांच्या नात्यात प्रचंड तणाव निर्माण झाल्याने सरांच्या सुशिक्षित असलेल्या डॉ मुलांनी, मुलीने, सरांच्या पत्नीने सर्वांनीच सरांकडे त्यांच्या आजारपणात ५ वर्ष पाठ फिरविली. सरांनी त्यांना मिळत असलेल्या पेन्शन मधूनच त्यांचा चरितार्थ भागवला. यावेळी त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा करण्याचे कार्य त्यांची पुतणी वत्सला नंदकुमार कुऱ्हाडे यांनी व त्यांचे पती यांनी केली. यामुळे देवकर सरांच्या अंतिम इच्छेनुसार गावाकऱ्यांना भावनिक साद घातली होती की त्यांच्या मृत्यू पशाचात त्यांच्या पत्नी व तिन्ही मुलांना अंत्यविधी पासून दूर ठेवावे व शरीरास स्पर्श ही करू देऊ नये त्यानुसार मंगळवारी त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची तिन्हीही मुले या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आली होती. परंतु गावकऱ्यांनी या मुलांना हात लावु दिला नाही व त्यांच्या अंत्यविधी ची सर्व जबाबदारी गावक-यांणी तसेच त्यांची पुतणी वस्तला नंदकुमार कु-हाडे हिने केला. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नेताजीदादा डोके, विद्यमान पंचायत समितीचे सदस्य जिवन शिंदे, गावचे सरपंच प्रितम काळे, किशोर कु-हाडे,धनंजय काळे,संतोष खंडागळे,संदिप कु-हाडे, नंदकुमार कु-हाडे,सचिन वाळुंज,प्रदिप देवकर, बाळासाहेब कु-हाडे, गणेश गुंजाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया –
” देवकर सर आळे गावात असलेल्या ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या विद्यालयात सायन्स हा विषय शिकवत होते. त्यांनी निवृत्त झाल्यानंतर राजुरी व पिंपळवंडी या दोन गावांत असलेल्या विद्यालयांमध्ये विना मोबदला शिकवत होते.त्यांना दोन मुले व एक मुलगी असुन ते डॉक्टर आहेत. त्यांच्या सुना देखील डॉक्टर असुन असे असताना देखील त्यांचे शेवटच्या काळात खुप हाल झाले आहे. त्यांचा अंत्यविधीचा सर्व विधी आळे ग्रामस्थ व त्यांच्या पुतणी वस्तला कु-हाडे यांनी केला आहे. त्यांच्या अशा दुःखद निधनाने सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, नातेवाईक प्रचंड हळहळ व्यक्त करीत आहे.” – नेताजीदादा डोके,आळेफाटा


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *