समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला आपण हल्ला म्हणतो – संतोष बांगर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२६ सप्टेंबर २०२२


शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर रविवारी अमरावती होते. यावेळी कुटुंबासोबत देवदर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर काही शिवसैनिकांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. यावेळी ५० खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी केली. या हल्ल्यानंतर संतोष बांगर हे आक्रमक झाले आहेत.

मी माझी बायको आणि बहीण आम्ही तिघे देव दर्शनाला गेलो होतो. देवदर्शन करून बाहेर पडल्यानंतर दहा-पाच लोकांनी नारेबाजी करत माझ्या गाडीवर हाताने मारण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटतं की याला हल्ला म्हणता येणार नाही, हल्ला कशाला म्हणतात? समोर येऊन कुणी वार करत असेल तर त्याला आपण हल्ला म्हणतो. माझी बहीण आणि माझी पत्नी गाडीत नसती तर संतोष बांगर काय आहे हे मी त्यांना सांगितलं असतं,” अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *