चिमुरडीच्या बलात्काऱ्याला अखेर फाशी शिक्षा

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०१ मार्च २०२२

वेल्हे


पुणे जिल्ह्यातील वेल्हे पोलीस स्टेशनं हद्दीतील एका कातकरी समाजाची अल्पवयीन मुलगी हरवली असल्याची फिर्याद वेल्हे पोलीस स्टेशनं ला दाखल केल्या नंतर पुणे ग्रामीण चे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांना मुलीचे अपहरण झाल्याचा संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर परिस्थिती चे गांभीर्य ओळखून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हे पोलीस स्टेशनच्या सहकार्याने स्वतः दुर्गम भागात शोध मोहीम हाती घेतल्याच्या अनुषंगाने वेल्हे पोलीस स्टेशनंला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटना घडल्या नंतर दुसऱ्याच दिवशी पीडित मुलगी हीं मालखेड (ता. हवेली )ते थोपटेंवाडी रत्याच्या पुलाच्या मोरी मध्ये मयत आढळून आल्यानंतर गुन्ह्यातील कलम वाढविण्यात आले होते.सदर गुन्ह्यात वेल्हे पोलीस स्टेशनं चे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन तपास केल्यामुळे आरोपी संजय बबन काटकर वय वर्ष ३८राहणार कादणे पानशेत तालुका वेल्हे जिल्हा पुणे यास दुर्गम भागातून शोधून ताब्यात घेतल्या नंतर खाकी वर्दी चा हिसकादाखविल्यावर सदरचा गुन्हा कबूल केल्यामुळे अटक करून तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक यांच्या विनंती नुसार सदरचा खटला जलदगती न्यायालयात सुरु करण्यात आल्यानंतर एक वर्षाने या गुन्ह्यातील आरोपीला अखेर फाशीची शिक्षा सुनविण्यात आली आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तात्कालिन अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, एस एस बादल,आर एस गायकवाड,ए एन अडवाल, ए पी शिंदे,ए आर साळुंखे,एस आर ओमासे,व्ही एस मोरे,डी एन जाधव यांनी केला आहे तर विलास पठारे यांनी न्यायलयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहिले या गुन्ह्याचा शोध लावल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांच्या टीम ला ३५०००रुपयांचे बक्षीस देऊन कौतुकाची थाप पाठीवर दिली आहे.