” विश्वकर्मा पांचाळ सोनार समाज, लायंन्स क्लब कात्रज व रेड क्राँस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे धनकवडी येथे भव्य रकतदान शिबीर संपन्न ” .

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
नुकतेच विश्वकर्मा पांचाळ सोनार (सुवर्णकार) समाज व लायन्स क्लब कात्रज आणि रेड प्लस पुणे ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील रक्त धनकवडी परिसरात भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक गुन्हे व अन्वेषण शाखा संगीता यादव व ज्येष्ट साहित्यिक बबनराव पोतदार यांच्या हस्ते पार पडले. या रक्तदान शिबीरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
“कोविड विषाणूचा वाढता उद्रेक आणि सद्य स्थितीत जाणविणाऱ्या रक्त तसेच प्लाज्मा टंचाईच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करण्यासाठी उपस्थित असलेले रक्तदाते प्रत्यक्ष देवदूत आहेत,” असे भावनिक उद्गार पोतदार यांनी काढले.

सध्या कोसळलेल्या आपत्तीवर अशा प्रकारची शिबीरे ही काळाची गरज आहे असे मत लायन्स क्लब कात्रजचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल वरुडे पाटील यांनी व्यक्त केले. रविंद्र गोलार यांनी लसीकरण मोहीम आयोजित करण्याचे आवाहन करुन क्लबची सर्वतोपरी मदत होईल असे सांंगितले.
शिबीरात एकूण ९५ रक्तदात्यांचा सहभाग होता. गणपत दीक्षित, उर्मिला जाधव, आप्पासाहेब परांडे, डॉ.दीप्ती पोतदार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्वांना विविध भेटवस्तू व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या रक्तदान शिबीरासाठी संस्थेच्या अध्यक्षा रुपाली दीक्षित, चंद्रकांत पंडित, आशिष पंडित, वंदना पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.